Posted On: September 18th 2026, 08:06 pm
तब्बल १०० हून अधिक वर्षांची परंपरा लाभलेला हा आमचा बाप्पा… आणि त्याच्यासोबत आमच्या लाडक्या गौराईचीही हीच जुनी, जपलेली परंपरा. ❤️
पणजोबांनी बाप्पा बसवला, तर पणजीने म्हटलं,
“मीसुद्धा गौराई बसवणार!” 🥹❤️
तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा तशीच पुढे चालत आली आहे.
बहुतेक तुम्ही गौराईचं रूप मुखवट्याच्या स्वरूपात पाहिलं असेल; पण आमच्या घरी मात्र अगदी पारंपरिक पद्धतीने तेरड्याच्या झाडांमध्ये गौराई सजवली जाते. 🌿🌸
पणजीनंतर माझ्या आजीने, आजीनंतर माझ्या आईने आणि काकीने… गौराईची सुंदर रीतीने सेवा करण्याची ही परंपरा आजही तितक्याच प्रेमाने जपली आहे. ❤️
आणि ओवशाच्या दिवशी…
या गौराईजवळ डोकं टेकवून, डोळे मिटून काही क्षण बसलं की एक वेगळीच भावना मनात येते…
असं वाटतं, माझ्या आजीनेच मला पुन्हा तिच्या कुशीत घेतलं आहे. 🥹❤️
गौराईच्या रूपात आम्ही फक्त देवीला नाही, तर आमच्या पणजीची, आजीची आणि आमच्या घरच्या प्रत्येक मायलेकीची माया जपतो. 🌸
#gaurai #ganapatibappamorya #kokan #festivevibes❤️ #foryoupage💙