Instagram story viewer> @your_siddharth_13> Post
21 days ago
Photo by Siddharth Gaikwad on October 14, 2026. May be a selfie of one or more people, beard, people smiling, people standing and text.

0
Posted On: October 14th 2026, 03:23 pm
❤️🤝 प्रिय श्रेयस, माझ्या जिवलग मित्रा…
आज खूप दिवसांनी आपली भेट झाली आणि जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. अकरावीच्या पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये झालेली आपली ओळख आणि त्या ओळखीतून निर्माण झालेली आपली मैत्री आजही तितकीच घट्ट आहे, हीच आपल्या नात्याची खरी सुंदरता आहे.
आयुष्याच्या प्रवासात तू वेळोवेळी दिलेले सल्ले मी ऐकले नाही. त्यातील काही निर्णयांचे वाईट परिणामही आयुष्यात भोगावे लागले; पण त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारा आणि पुन्हा उभं राहण्याचं बळ देणारा मित्रही तूच होतास. आयुष्यात चांगले दिवस दाखवणारे अनेक जण भेटतात, पण वाईट काळात योग्य मार्ग दाखवणारे मित्र फार कमी असतात.
तुझ्यासारखा मित्र आयुष्यात आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुझ्या मैत्रीमुळे आयुष्याचा प्रवास अधिक सोपा वाटतो आणि कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याचं बळ मिळतं.
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की, तुला आयुष्यात भरपूर आनंद, उत्तम आरोग्य, यश आणि समाधान लाभो. तू खूप मोठा माणूस हो, तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि आयुष्यात तुला तुझ्या कष्टांचं योग्य फळ मिळो. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कायम असंच राहो. 💐🙏
#Love you, Shreya ❤️

More posts

back to up