Posted On: October 22nd 2026, 03:33 pm
*कोकणचा बालगंधर्व - ओमप्रकाश चव्हाण*
कोकणच्या दशावतारी कलेचा खरा हिरा म्हणजे ओमप्रकाश चव्हाण! 💐
आजच्या बालगंधर्वांचा (नारायण श्रीपाद राजहंस) वारसा चालवणारे कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पण हे फक्त नाव नाही, तर त्यांच्या अभिनयाची पावती आहे.
*त्यांना ‘बालगंधर्व’ का म्हणतात?*
खऱ्या बालगंधर्वांप्रमाणेच ओमप्रकाश चव्हाण स्त्री भूमिका इतक्या अप्रतिम वठवतात की, तो पुरुष आहे यावर विश्वासच बसत नाही. त्यांची देहबोली, लावण्य, आवाजातील गोडवा आणि नृत्य पाहून रसिक मंत्रमुग्ध होतात.
एका पुरस्कार सोहळ्यात त्यांना स्त्री वेशात पाहून स्वतः शाहरुख खान सुद्धा हा पुरुष आहे यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. जेव्हा सत्य कळाले तेव्हा शाहरुखने भर सभागृहात उठून त्यांना नमस्कार केला होता - हा आहे त्यांच्या कलेचा सन्मान! 🙏
*दशावतारासाठी त्याग*
झगमगत्या दुनियेत मोठमोठ्या संधी चालून आल्या तरी त्यांनी कधीच दशावतारी कलेकडे पाठ फिरवली नाही. हीच कला त्यांचा श्वास आहे. एकदा तर हृदयविकाराचा झटका येऊनही त्यांनी 3 तासांचा नाट्यप्रयोग पूर्ण केला आणि मगच उपचार घेतले. हीच खरी कलानिष्ठा!
पद्मभूषण बालगंधर्वांच्या नावाने ओळखले जाणारे हे कलाकार आजही बेताच्या परिस्थितीत राहून आपली कला जिवंत ठेवत आहेत. अशा कलाकारांना मानाचा मुजरा.
#बालगंधर्व #ओमप्रकाशचव्हाण #दशावतार #कोकण MarathiCulture Sindhudurg Kudal BalGandharva Dashavatar