Posted On: December 4th 2022, 05:22 am
Samuchit Enviro Tech: Enabling Sustainability
हिवाळ्यात शहरातील वायू प्रदूषणात आणखी भर पडू लागते... काय घडते असे?
पानगळ सुरू होते आणि काडीकचरा वाढतो. कंपोस्टिंगचा वेगही कमी तापमानामुळे मंदावलेला असतो. अशा परिस्थितीत कंपोस्ट खताची व्यवस्थाही अपुरी पडू लागते. बागांमध्ये पालापाचोळ्याचे ढीग गोळा होतात. कडाक्याच्या थंडीत इमारतींच्या रखवालदारांना शेकोटीची ऊब हवीशी वाटते. आवार स्वच्छ दिसावे असे वाटणाऱ्यांना कचऱ्याला काडी लावून देण्याचा मोह होऊ लागतो....
हे टाळता येऊ शकते.
प्रदूषण होऊ न देताही बागेतील काडीकचऱ्याची वैज्ञानिक पध्दतीने विल्हेवाट लावणे शक्य आहे. आणि हे करताना क्लायमेट चेंजचा यशस्वी मुकाबला करणारी एक कृती आपल्या हातून होऊन जाईल.
हे सारे समजून घेण्याची सुवर्णसंधी चुकवू नका.
बागेतील काडीकचऱ्याचा उपयोग कसकसा होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक व चर्चा.
६ डिसें २०२२. मंगळवार. दुपारी ३ वाजता.
समुचित एन्व्हायरो टेक, एकता पार्क, निर्मिती शोरूममागे, अभिनव शाळेशेजारी, लॉ कॉलेज रस्ता, पुणे ४११००४
शुल्क रू.५० फक्त
व्हॉटसप +91 92268 94206 इमेल
[email protected]