Posted On: September 28th 2025, 06:52 am
लोणारचे कमळजा माता शक्तिपीठ पाण्याखाली, देवीच्या गाभाऱ्यात शिरले पाणी | Buldhana News
जगप्रसिद्ध लोणार सरोवराने यंदा अभूतपूर्व स्तर गाठला असून, सततच्या पावसामुळे सरोवराची जलपातळी इतकी वाढली की, थेट कमळजा मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरले आहे.. अभ्यासकांचे म्हणण्यानुसार प्रथमच अशी घटना घडलीय .. लोणार सरोवरापासून ४०० मीटर अंतरावर आणि १० फूट उंचीवर असलेले कमळजा मातेचे शक्तिपीठ आता ४० टक्के पाण्याखाली गेले असून पाऊस असाच सुरू राहिला तर संपूर्ण मंदिर जलमय होण्याची शक्यता आहे .. सरोवरातील फक्त कमळजा माता मंदिरच नव्हे, तर मोर महादेव, वाघ महादेव, बगीचा महादेव यांसह परिसरातील अनेक प्राचिन मंदिरे पाण्यात बुडाली आहेत.. या वर्षी प्रथमच सरोवराची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल.
buldhana news, lonar kamalja mata, temple flood, maharashtra rain news, temple submerged, religious place flood, local news buldhana, temple water level, flood update maharashtra, devotion in flood
#buldhana #templeflood #kamaljamata #maharashtranews #floodupdate #religiousplace #devotion #rainnews #localsafety #templeupdate Load More