Posted On: June 5th 2026, 03:33 am
3 July ला रिलीज होणाऱ्या “Out Of Syllabus” या माझ्या चित्रपटाच्या निमित्ताने…
आज वृक्षारोपण करताना आनंदी होण्यापेक्षा आत्मपरीक्षण जास्त करावंसं वाटतंय…आणि म्हणूनच ‘Happy World Environment Day’ म्हणताना मन जड झालंय.
खरंच, आपण सगळेच आता “Out Of Line” आणि “Out Of Order” होत चाललो आहोत असं स्वतःबद्दलच वाटू लागलंय.
मनात प्रश्नांचं एक वादळ सुरू आहे…
मी “World Environment Day” साजरा करण्यासाठी वृक्षारोपणाला निघालोय…
पण चार चाकी गाडीतून.
रस्त्यावर नजर टाकली की माझ्यासारख्याच हजारो गाड्यांची गर्दी दिसते.
कॅमेऱ्यासाठी पोझ देताना मन मात्र स्वतःवरच हसतंय…
कधी कधी स्वतःचीच कीव येते.
आपलं सगळ्यांचंच वागणं आणि बोलणं किती विसंगत होत चाललं आहे!
आपण बोलतो एक आणि करतो दुसरंच.
आधुनिकीकरण होतंय की अधोगती, हेच कळेनासं झालं आहे.
निसर्गासोबत आपण जे काही करत आहोत, त्याचा विचार केला की खरंच घाबरायला होतं.
आज वृक्षारोपण करताना आनंदापेक्षा आत्मपरीक्षण जास्त वाटतंय.
जड अंतःकरणाने…
Happy World Environment Day. 🌱
#OutOfSyllabus #film #3rd
#july #release Load More