Posted On: June 10th 2026, 07:53 pm
आजी,
सर्वांत लहान, आणि तरीही सगळ्यांची लाडकी 🌺
केरळपासून केदारनाथपर्यंत प्रवास केला. दूध पोळी, गोड पदार्थ आणि कॉफी — हे तिला खूप आवडायचं. रात्री अकरा वाजता पण ती मंदिरात असायची — कॉलनीतल्या अनेक मैत्रिणींसोबत गप्पा मारत.
आपण तेरा जण असू आणि आंबे फक्त पाच, तरी ती असे कापायची की प्रत्येक तुकडा जणू फक्त तुमच्यासाठीच बनवला आहे असं वाटायचं.
दर दिवाळीला ती हॉलपासून किचनपर्यंत स्वयंपाक करायची, आणि जे दूर होते त्यांना ताजं फरसाण पाठवायची. अंजीर, दिंख, लोणचं — जे हाताशी असेल त्यातून ती तिच्या कुटुंबाला जवळ ठेवायची, तिच्या आवडत्या चवींमध्ये गुंफून.
मी France hun परत आले तेव्हा तिने रांगोळीत “Welcome” लिहिलं होतं आणि खरबुजाची ताटली वाढली होती — कारण ती आईला दर वर्षी विचारायची, “साकूला France मध्ये मिळतात का गं खरबुजे?”
खाली बसून पूजा करणं जड झालं तरी ती पूजा करत राहिली. काही दिवसांपूर्वीच तिने अधिक मासाची मोठी पूजा केली — त्या पवित्र महिन्याचं पुण्य तिच्या आत्म्याला लाभलं असेल यावर माझा विश्वास आहे.
आयुष्यभर तिने आपल्या कुटुंबासाठी सर्वोत्तम दिलं, अगदी मनापासून. आणि जाताना पण तिची देवाकडे एकच इच्छा होती — वेळ आली की सुखाने जावं.
आज सकाळी उठले तेव्हा मला दह वेळा शिंका आल्या — कदाचित कणाला हसू येईल, पण आजी आणि माझ्या शिंका एकसारख्याच असतात. हे आठवलं आणि ओठांवर हसू आलं — तिच्या शिंका तर कत्येक घरांपर्यंत ऐकू जायच्या.
आजी म्हणजे आमची आधारस्तंभ. ती फक्त वयाने मोठी नाही, तर अनुभवाने समृद्ध होती. तिच्या जीवनातून मिळणाऱ्या शिकवणी शब्दांपक्षा जास्त प्रभाव होत्या. तिच्या आयुष्यातून मला हेच शकायला मिळतं की खर सुंदरता बाह्य रूपात नसून, मनाच पवित्रतेत आणि वर्तनातील नम्रतेत असते.
दूर राहणं वदनादायक आहे — अशा कठीण दिवसांत आई पासून, सगळ कुटुंबापासून मैल दूर असणं जड जातं. पण हीच किमत आहे, घरापासून दूर राहण्याची. तरी आपण सगळे एकत्र येऊ — त्या आनंदाच्या, गोड आठवणींमध्ये. आमच्या आठवणींमध्ये कायमची, माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ, आपली सर्वात खबीर आजी 🤍
साकू
Load More