14 days agoजितू दादा आज अचानक Aqua Metro मध्ये तुम्हाला पाहिलं आणि खरंच काही क्षण विश्वासच बसला नाही. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुम्हाला एकदा भेटावं म्हणून खूप लोकांना विचारलं होतं कुणी सेटवर भेटतील असं सांगितलं, कुणी पवईला राहतात तिथे जाऊन भेट असं सांगितलं पण भेटीचा योग काही आला नाही. शेवटी देवाला एवढीच प्रार्थना केली होती की कधी तरी जितू दादांची भेट घडू दे. आज देवाने भेट तर घडवली, पण तुम्ही समोर असताना तुम्हाला आवाज द्यायची हिंमतच झाली नाही. T2 Terminal ला तुम्ही उतरला आणि मी अगदी त्याच सीटवर बसलो जिथे तुम्ही बसला होता. बोलता आलं नाही पण आजचा हा छोटासा प्रसंग माझ्यासाठी खूप मोठी आठवण बनून राहील. कदाचित पुढच्या वेळी योग आला तर फक्त लांबून पाहणारा चाहता नसेन तुमच्याशी दोन शब्द बोलायलाही नक्की धजावेन. @jitendrajoshi27
