Instagram story viewer> @archsourabh> Posts
4.7K
followers
2063
following
|| सौरभ मराठे ||
वास्तुविद्या पारंगत । भारतीय विद्या अभ्यासक |
Conservation Architect । Indologist ।
Academician
@sahoj.in
🇮🇳🇲🇾🇸🇬🇱🇰🇴🇲🇦🇪🇹🇿🇮🇹🇻🇦
POSTS STORIES REELS TAGGED
One temple. Two nations. A near-war no one talks about.
Discover how the Parvati Temple almost pushed India and Nepal into conflict.
Watch Story of Pune, streaming 24th December on The Subculture YouTube channel. by @archsourabh
14
10 months ago
Download
शोध देवीचा !!
जागर आदिशक्तीचा !!

देवी ही संकल्पना मुळातच अफाट आहे. तिच्याकडे केवळ एका देवतेच्या किंवा पूजेच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर तिच्या संकल्पनेचा आवाका समजून घेणं कठीण आहे. 

भारतीय सांस्कृतिक परंपरेत देवी ही शक्ती, बुद्धी, श्रद्धा, शांती, समृद्धी, सृजन आणि पोषण अशा अनेक मानवी व वैश्विक तत्त्वांचं प्रतीक म्हणून विकसित होत गेली.

वैदिक साहित्यापासूनच स्त्रीदैवतांच्या विविध संकल्पना दिसून येतात. अदिती ही देवांची जननी म्हणून विश्वाच्या व्यापकतेशी आणि मातृत्वाशी जोडली गेली, तर वाक् ही वाणी आणि अभिव्यक्तीचं महत्त्व अधोरेखित करणारी देवता ठरली. माणसाला विचार व्यक्त करण्याची, ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची आणि शब्दांतून जग समजून घेण्याची क्षमता आहे, या अनुभवाला वाक् या संकल्पनेतून दैवी अधिष्ठान मिळालं. रात्रीच्या सूक्तात रात्र ही केवळ अंधाराची वेळ राहत नाही; ती संरक्षण, विश्रांती आणि जीवनाच्या नैसर्गिक लयीचा भाग बनते. उषा नव्या दिवसाच्या आगमनातून प्रकाश आणि नव्या शक्यतांचं प्रतीक ठरते.

पुढील काळात या स्त्रीदैवतांच्या संकल्पना अधिक विस्तारत गेल्या. दुर्गेच्या रूपात संकटांचा सामना करणारी आणि दुष्ट शक्तींना प्रतिकार करणारी ऊर्जा व्यक्त झाली. लक्ष्मी समृद्धी आणि संपन्नतेशी, तर सरस्वती ज्ञान, विद्या आणि कलांशी जोडली गेली. कालीच्या रूपात काळ, परिवर्तन आणि संहाराचं सामर्थ्य व्यक्त झालं. त्याच वेळी अलक्ष्मीसारख्या संकल्पनेत अभाव, दारिद्र्य आणि अमंगल यांचाही विचार केला गेला. म्हणजेच जीवनातील केवळ सकारात्मक किंवा मंगल अनुभवच नव्हे, तर त्यांच्या विरुद्ध असलेल्या वास्तवाचाही या सांस्कृतिक विश्वात विचार झाला.

या सर्व रूपांकडे एकत्रितपणे पाहिलं, तर देवी ही केवळ ममतेची किंवा कोमलतेची प्रतिमा नसल्याचं लक्षात येतं. तिच्यात सृजनता आहे, पण त्याचबरोबर संरक्षणही आहे. ती पोषण करते, पण अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शक्तीदेखील दर्शवते. ती ज्ञानाचं प्रतीक आहे, श्रद्धेचं अधिष्ठान आहे आणि मानवी जीवनाला अर्थ देणाऱ्या अनेक अनुभवांचं सांस्कृतिक रूप आहे.

देवीची संकल्पना काळानुसार बदलत, विस्तारत आणि नव्याने समजून घेतली जात राहिली.

देवीच्या या बहुआयामी संकल्पनेचा आदर करूया, तिचा अभ्यास करूया. तिच्या विविध रूपांचा अर्थ समजून घेत, या समृद्ध परंपरेचं भान अधिक व्यापक करूया.

देवी ही एका रूपात सामावणारी संकल्पना नाही; ती असंख्य रूपांतून व्यक्त होणारं एक विस्तीर्ण विचारविश्व आहे

©
सौरभ मराठे
नवरात्र २०२६ taken in Pune, Maharashtra by @archsourabh
6
7 days ago
Download
मंडईचा १४० वा वाढदिवस!

आज जिथे रोज हजारो पुणेकरांची पावलं पडतात, भाज्यांचा सुगंध दरवळतो आणि व्यापाऱ्यांच्या हाका ऐकू येतात, त्या मंडईची गोष्ट केवळ एका बाजाराची नाही… ती आहे पुण्याच्या बदलत्या इतिहासाची आणि संस्कृतीची गोष्ट!

मराठा साम्राज्याचा अस्त झाला आणि ब्रिटिश सत्तेचा काळ सुरू झाला. त्या काळात पुण्याचा बाजार शनिवारवाड्याच्या दरवाज्याजवळ भरत असे. ब्रिटिशांनी हा बाजार तिथून हलवण्याचा निर्णय घेतला आणि रामेश्वर मंदिराजवळील चकले बागेत नवा, नियोजित बाजार उभारण्याचे ठरवले.

आज हे आपल्याला कदाचित खरे वाटणार नाही, पण त्या काळी ही जागा पुण्याच्या बाहेरच म्हणावी लागेल. त्यामुळे बाजार इथे हलवण्याच्या निर्णयाला अनेक पुणेकरांचा विरोध झाला. त्यातच इमारतीत बाजार भरवण्याची कल्पनाही त्या काळासाठी अगदी नवी होती.

काही व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देऊन, तर काहींना थोड्या दबावाने या ठिकाणी हलवण्यात आले. पण हळूहळू लोकांना ही जागा आवडू लागली… आणि काळाच्या ओघात मंडई पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली.

ही भव्य वास्तू कर्नल डुकैट यांनी डिझाइन केली आणि तिचे बांधकाम वासुदेव कानिटकर यांनी केले. ५ ऑक्टोबर १८८६ रोजी मंडई सर्वांसाठी खुली झाली.

भव्य खांब, वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना आणि परदेशातून आणलेले बांधकाम साहित्य… या इमारतीच्या बांधकामासाठी त्या काळी काही लाख रुपये खर्च झाले होते. त्या काळाच्या मानाने ही रक्कम प्रचंड होती.

पुणे वाढत गेले… शहर बदलत गेले… पिढ्या बदलल्या… पण मंडई मात्र पुणेकरांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू राहिली.

इथे फक्त भाजी विकली गेली नाही; इथे गप्पा रंगल्या, चर्चा झाल्या, सभा भरल्या, विचारांची देवाणघेवाण झाली आणि असंख्य आठवणी जन्माला आल्या.

म्हणूनच पुढे “मंडई विद्यापीठ” ही संकल्पना प्रसिद्ध झाली — कारण इथून ग्रॅज्युएट होणारे लोक वेगळेच असायचे!

आज या पुण्याच्या अभिमानास्पद वारशाला १४० वर्षे पूर्ण झाली आहेत.

पिढ्या बदलल्या, काळ बदलला, शहर बदलले… पण मंडईचा गजबजलेला आवाज, तिचा सुगंध आणि तिचा आत्मा आजही तसाच जिवंत आहे.

मंडईला १४० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

©️ सौरभ मराठे 
५ ऑक्टोबर २०२६

(पोस्ट शेअर करताना कृपया फोटो आणि नावासकट शेअर करावी, ही विनंती.)

#Heritage #Pune #maharashtra #SourabhMarathe taken in Mahatma Phule Mandai by @archsourabh
0
12 days ago
Download
A Drop of Water on a Lotus Leaf…

Life is like a drop of water resting on a lotus leaf. Beautiful, delicate, and uncertain. One moment it glistens in the sunlight, and the next, it slips away.

Our ancient Indian philosophy has captured this simple yet profound truth through the imagery of a lotus leaf and a water droplet. A tiny observation from nature becomes a reflection on life, attachment, detachment, and the very nature of our existence.

In Bhaja Govindam (Verse 4), Adi Shankaracharya reminds us:
नलिनीदलगत जलमतितरलं
तद्वज्जीवितमतिशयचपलम् ।
Just as a drop of water on a lotus leaf is unstable, so is human life—fleeting, fragile, and transient.

The Bhagavad Gita (Chapter 5, Karma Sanyasa Yoga, Verse 10) takes this thought further:
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥
Like a lotus leaf that remains untouched by water, one can live in this world, fulfil one’s duties, and yet remain free from attachment.

The Valmiki Ramayana uses the same imagery to reflect upon the nature of affection:
यथा पुष्करपत्रेषु पतितास्तोयबिन्दवः ।
न श्लेषमभिगच्छन्ति तथानार्येषु सौहृदम् ॥
Just as drops of water do not adhere to lotus leaves, affection may fail to endure where there is no genuine worthiness.

The Yoga Vasistha explores the distinction between the soul and the body through a similar image:
पृथगात्मा पृथग्देही जलपद्मलवोपमौ ।
The soul and the body are distinct, like a water droplet and a lotus.

Different texts, different perspectives, yet a common thread runs through them all.
Perhaps life is not about holding on to everything, but about learning to let go gracefully. taken in Pune, Maharashtra by @archsourabh
0
18 days ago
Download
॰महालय ॰
श्राद्ध म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नव्हे, तर आपल्या पूर्वजांप्रती असलेली श्रद्धा, प्रेम, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा एक पवित्र मार्ग आहे!

पितरांना उद्देशून योग्य स्थळी, योग्य काळी आणि धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधीनुसार श्रद्धापूर्वक केलेले कर्म म्हणजे श्राद्ध होय.

‘पितर’ या शब्दाचे दोन अर्थ सांगितले जातात. एखाद्या मनुष्याचे तीन मृत पूर्वज म्हणजे पिता, पितामह आणि प्रपितामह अर्थात वडील, आजोबा आणि पणजोबा. तसेच, प्राचीन काळातील आणि स्वतंत्र लोकात वास करतात असे मानले जाणारे पूर्वज यांनाही पितर म्हणतात.

‘श्राद्ध’ हा शब्द ‘श्रद्धा’ या शब्दाशी संबंधित आहे. श्राद्धाच्या वेळी ब्राह्मणांना दिलेले अन्न, दान आणि दक्षिणा पितरांपर्यंत पोहोचतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पितर संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात, अशी मान्यता आहे. म्हणूनच श्राद्ध करताना श्रद्धा, प्रेम आणि कृतज्ञता महत्त्वाची मानली जाते.

धर्मशास्त्रात श्राद्धाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. मृत व्यक्तीच्या मृत्यूच्या तिथीला श्राद्ध करणे महत्त्वाचे मानले जाते. मृत्यूचा महिना माहीत नसल्यास मार्गशीर्ष किंवा माघ महिन्यात श्राद्ध करण्याची परंपरा काही मतांनुसार आहे. तिथी माहीत नसल्यास घरातून निघाल्याची किंवा मृत्यूची वार्ता मिळाल्याची तिथी विचारात घेतली जाते.

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाला महालय पक्ष किंवा पितृपक्ष म्हणतात. या काळात पितरांच्या स्मरणार्थ श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. महालय श्राद्ध हे पर्वण श्राद्धाच्या पद्धतीनुसार करण्याची परंपरा आहे.

मग श्राद्ध करण्याचा अधिकार कोणाला असतो? विष्णुधर्मसूत्रानुसार, मृत व्यक्तीची संपत्ती स्वीकारणाऱ्या व्यक्तीने तिच्यासाठी श्राद्ध करावे, असे सांगितले आहे. गोभिलस्मृतीमध्ये काही नातेसंबंधांबाबत विशिष्ट नियम आहेत. मात्र, बौधायन आणि वृद्धशातातपन यांच्या मतांनुसार प्रेमभावनेने कोणालाही श्राद्ध करण्याची अनुमती असल्याचे सांगितले जाते.

उपनयन संस्कार न झालेल्या व्यक्तीलाही श्राद्धकर्मात वैदिक मंत्रांचा उच्चार करण्याची अनुमती असल्याचे अनेक धर्मशास्त्रकारांनी मान्य केले आहे.

थोडक्यात, आपल्या पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांनी दिलेले संस्कार, त्यांचे योगदान आणि त्यांच्या आठवणी जपण्यासाठी श्रद्धेने केलेले कार्य म्हणजेच श्राद्ध
©
सौरभ मराठे taken in Kothrud, Pune by @archsourabh
1
20 days ago
Download
महालक्ष्मी पूजन २०२६ taken in Kothrud, Pune by @archsourabh
10
a month ago
Download
हरतालिका २०२६ ! taken in Pune, Maharashtra by @archsourabh
0
a month ago
Download
ॐ योऽपां पुष्प वेद, पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति। taken in Pune, Maharashtra by @archsourabh
4
a month ago
Download
मंत्रजागर २०२६ by @archsourabh
0
a month ago
Download
मंत्रजागर २०२६ by @archsourabh
0
a month ago
Download
taken in Kothrud, Pune by @archsourabh
3
a month ago
Download
•|| मोदकं समर्पयामी ||• taken in Kothrud, Pune by @archsourabh
2
a month ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up