Instagram story viewer> @iambadasdanve> Posts
229.5K
followers
150
following
MLC & Former Leader of Opposition, Maharashtra Legislative Council.
@shivsena Leader.
POSTS STORIES REELS TAGGED
चांगलं काही झालं की फोटो, पोस्टर, जाहिराती आणि श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री सर्वात पुढे.

पण अपयश, पेपरफुटी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुर्घटना किंवा जनतेचे हाल झाले की जबाबदारीसाठी कोणीच नाही… हाच आजच्या सत्तेचा खरा चेहरा.
#accountability #governmentreality by @iambadasdanve
1k
4 months ago
Download
देशविरोधी शक्तींना धडक देत त्यांना अधू करून सोडणारे, सत्तांधारी राज्यकर्त्यांना प्रसंगी आरसा दाखवणारे, देशाच्या राजकारणाला हिंदुत्वाच्या माध्यमातून नवी बळकटी देणारे सर्वांचे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख, राष्ट्राभिमानी, दृष्ट्या महान नेत्याला आज जयंतीदिनी विनम्र अभिवादन❤️🙏
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#balsahebthackery #shivsena #shivsenapramukha #thackeray #hindutva #uddhavsahebthackeray #adityathackeray #uddhavthackeray #ambadasdanve #mumbai #sambhajingar #maharashtra #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे #शिवसेना by @iambadasdanve
183
4 years ago
Download
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पक्षाने एक सर्वसामान्य शिवसैनिकावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेची जबाबदारी दिली, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा मी मनापासून ऋणी आहे. त्यांनी व पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा घेऊन सरकारला धारेवर धरण्याची जबाबदारी मी पूर्ण ताकदीने पार पाडेन. तसेच स्वतःच्या स्वार्थसाठी गद्दारी करत बनलेल्या या भ्रष्ट सरकारच्या विरोधात संघर्ष करु. पुढील काळ हा संघर्षाचा! taken in Matoshree,Kalanagar by @iambadasdanve
297
4 years ago
Download
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्र, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर प्रणित दुर्गा सप्तशती पाठ आज कर्णपुरा देवी मंदिर संस्थान, छत्रपती संभाजीनगर येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या धार्मिक सोहळ्यात हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामूहिक दुर्गा सप्तशतीचे श्रद्धापूर्वक पठण केले. माता जगदंबेच्या जयघोषाने आणि सामूहिक मंत्रोच्चाराने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. by @iambadasdanve
0
12 minutes ago
Download
नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी कर्णपुरा देवी मंदिर संस्थान येथे आदिशक्ती आई जगदंबेच्या माता महागौरी या दिव्य आणि मंगलमय रूपाची मनोभावे प्रार्थना केली.

माता महागौरीच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि शांती नांदो. प्रत्येकाच्या आयुष्यातील संकटे दूर होऊन नवचैतन्य, सकारात्मकता आणि आनंदाचा प्रकाश पसरू दे, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. by @iambadasdanve
0
14 minutes ago
Download
आज पैठण येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. दिलीप घुगे साहेब यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, आमदार श्री.अंबादास दादा दानवे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी उपस्थित होते. taken in Paithan by @iambadasdanve
0
19 minutes ago
Download
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. दिलीप घुगे यांच्या प्रचारार्थ आज अहमदपूर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

मराठवाड्याच्या विकासासाठी शिवसेनेची भूमिका, पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारी आणि युवकांच्या भविष्याशी निगडित मुद्दे प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी शिवसैनिकांना केले.याप्रसंगी लोकसभा संपर्कप्रमुख परमेश्वर सातपुते व जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी उपस्थित होते. by @iambadasdanve
0
2 days ago
Download
लातूर जिल्हा वकील संघास आज भेट देऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ चे अधिकृत उमेदवार श्री. दिलीप घुगे यांच्या प्रचारार्थ वकिलांशी संवाद साधला.

मराठवाड्यातील सुशिक्षित तरुणांचे प्रश्न, बेरोजगारी, रखडलेली भरती प्रक्रिया आणि पदवीधरांच्या विविध समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. बहुजन समाजातून पुढे आलेले, अभ्यासू, होतकरू आणि मराठवाड्याच्या प्रश्नांची जाण असणारे श्री. दिलीप घुगे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

मराठवाड्याचे प्रश्न, पदवीधरांचे हक्क आणि आपल्या मातीची अस्मिता जपणाऱ्या शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा आणि श्री. दिलीप घुगे यांना विजयी करा, अशी भूमिका मांडली. 

याप्रसंगी लोकसभा संपर्कप्रमुख परमेश्वर सातपुते, उमेदवार श्री. दिलीप घुगे, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष शिवकुमार जाधव, उपाध्यक्ष एल. डी. चामे व अविनाश रशमे उपस्थित होते. taken in Latur by @iambadasdanve
2
2 days ago
Download
🎓 मराठवाड्याच्या पदवीधरांचा आवाज, आता विधान परिषदेत बुलंद होणार!

शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास, स्पर्धा परीक्षा, उद्योजकता आणि पदवीधरांच्या न्याय्य हक्कांसाठी नवा संकल्प!

मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचा विकास, प्रत्येक पदवीधराला समान संधी आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध नेतृत्व!

सामान्यांतला, सामान्यांसाठी — दिलीप हरिभाऊ घुगे!

🔥 आता परिवर्तनाची नवी मशाल पेटवण्याची वेळ आली आहे!

🎓 मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६

#दिलीपहरिभाऊघुगे #मराठवाडापदवीधर #पदवीधरनिवडणूक२०२६ #परिवर्तनाचीमशाल by @iambadasdanve
13
2 days ago
Download
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. दिलीप घुगे यांच्या प्रचारार्थ आज लातूर येथे बैठक संपन्न झाली.

मराठवाड्यातील पदवीधर युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी, रखडलेली भरती प्रक्रिया, उच्च शिक्षणाचा दर्जा आणि रोजगाराच्या मर्यादित संधी या महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

युवकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या निवडणुकीत श्री. दिलीप घुगे यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा. 

याप्रसंगी लोकसभा संपर्कप्रमुख परमेश्वर सातपुते व जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी उपस्थित होते. by @iambadasdanve
3
3 days ago
Download
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक – २०२६ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री.दिलीप घुगे यांच्या प्रचारार्थ आज धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

पदवीधरांचे प्रश्न, सुशिक्षित तरुणांचे भविष्य आणि त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे मैदानात उतरून दिलीप घुगे यांना विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. 

यावेळी आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, जितेंद्र कानडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. by @iambadasdanve
0
3 days ago
Download
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे जाऊन दर्शन घेतले.

यावेळी महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदू दे आणि बळीराजाला या कठीण संकटातून सावरण्याचे बळ मिळू दे, अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली.

महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर होवो, शेतकऱ्यांच्या शेतात पुन्हा हिरवळ फुलो, बळीराजाच्या कष्टांना यश मिळो आणि प्रत्येक शेतकरी कुटुंब सुखी, समृद्ध व संपन्न होवो! taken in Tuljapur - तुळजापुर by @iambadasdanve
3
3 days ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up