Posted On: September 12th 2026, 01:45 pm
कोल्हापुरात स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद; शिवसेना आक्रमक, महावितरण कर्मचाऱ्यांना सुनावले!
कोल्हापुरात स्मार्ट मीटर बसवण्यावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. महावितरणचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी परिसरात फिरत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष विशाल देवकुळे यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले.
स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध करत देवकुळे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्मार्ट मीटर बसवण्यावरून नागरिकांमध्येही नाराजी असल्याचे यावेळी दिसून आले.
#SmartMeter #Kolhapur #Mahavitaran #MSEDCL #SmartMeterProtest VishalDevkule ShivsenaUBT MaharashtraNews MarathiNews KolhapurUpdates
Load More