Instagram story viewer> @___.yatu.___> Tagged
101
followers
28
following
सेवेकरी @tochi_ek_samartha
कोकणकर 🌴❤️
अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤️😇
POSTS STORIES REELS TAGGED
♥️🧿

#jaishankar #jaygirnari #shreeswamisamartha
27
या पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्नदानाची सेवा करायची आहे का? 🪷

अजून वेळ गेलेली नाही… ❤️

येत्या शुक्रवारी, १० ऑक्टोबर आम्ही वृद्धाश्रमात अन्नदान सेवा करणार आहोत. 🙏🏻

तुम्हालाही या सेवेत सहभागी व्हायचं असेल, तर
तुम्हाला जे शक्य आणि उपयुक्त वाटेल ते दान करा.
धान्य, किराणा साहित्य किंवा अन्नदानासाठी तुमचे योगदान — प्रत्येक गोष्ट मनापासून स्वीकारली जाईल. ❤️

सेवा छोटी-मोठी नसते… भावना मोठी असते. 🪷

📌 १० ऑक्टोबरपूर्वी आम्हाला संपर्क करा.
या सेवेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी:

📞 9082770155 | 9022217147

आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ… कुणाच्या तरी आजचा दिवस थोडा सुखकर करूया. 🙏🏻❤️

#pitrupaksha #donation #fooddonation #ashramseva #tochieksamartha
36
गिरनार प्रवास आणि गिरनार अनुभव ♥️🧿

#girnar #girnari #anubhav #junagadh #shreeswamisamarth
18
🪷 ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 🪷

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या जयंतीच्या पावन निमित्ताने, एका सुंदर आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात… 🙏🏻✨

‘सद्गुरुंना जाणा रे’ या मालिकेतून यावेळी आपण सिद्ध मंगल स्तोत्र अधिक जवळून जाणून घेणार आहोत. 🪷

फक्त पठण करण्यापुरतं नाही… तर या स्तोत्रातील शब्दांचा भाव, त्यांचा अर्थ आणि आपल्या साधनेत त्याचा अनुभव कसा घ्यायचा, हे समजून घेऊया. ❤️

शुक्रवार, शनिवार आणि रविवार
रात्री १०:३० ते ११:१५
🔴 LIVE

या तीन दिवसांच्या भक्तिमय संवादात आपण एकत्र मंत्रपठण करूया, अर्थ समजून घेऊया आणि सद्गुरूंच्या कृपेचा अनुभव घेऊया. 🙏🏻

Follow @tochieksamartha for more info.

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 🪷
54
एक अनोखी सेवा ♥️🧿 

शरीराची जखम दिसते…पण मनाची जखम दिसत नाही.

आणि कदाचित म्हणूनच त्या मनाला औषधापेक्षा… कधी कधी प्रेमाची,आपलेपणाची आणि एका मायेच्या स्पर्शाची गरज असते❤️

#tochieksamartha #swamiseva #ashramseva #deva #swami
14
🌸 काही भेटी फक्त आठवणी देत नाहीत… त्या आपल्याला आतून बदलून जातात. 🌸

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने तोचि एक समर्थ परिवारातर्फे श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, रबाळे येथे आश्रम सेवा करण्याचा योग आला. 🙏🏻

मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानांचा सामना करणाऱ्या जवळपास ९० रहिवाशांसोबत काही क्षण गप्पा, अंताक्षरी, डान्स, मस्ती आणि मनमोकळा वेळ घालवला.

त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, उत्साह आणि आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी पाहून मन भरून आलं. 🌷

त्यांना आनंद देण्यासाठी गेलेलो आम्ही…पण त्यांच्या निरागस हास्याने आणि उत्साहाने आम्हालाच जगण्याची नवी ऊर्जा दिली. ❤️

तोचि एक समर्थच्या “देवाची तिजोरी” अंतर्गत तांदूळ, गहू, डाळी, कडधान्य, तेल, चहा, साखर, डायपर्स, मॅक्सी, चादरी आणि दैनंदिन गरजेचं साहित्यही अर्पण करता आलं.

पण या सेवेची खरी कमाई वस्तूंमध्ये नव्हती…

ती होती त्यांच्या हास्यात,
त्यांच्या सहवासात
आणि त्या काही क्षणांत मिळालेल्या अमूल्य समाधानात. 🥹❤️

कारण शेवटी…

सेवा म्हणजे फक्त काहीतरी देणं नाही,
तर कुणाच्या आयुष्यात काही क्षण आनंदाचे बनून जाणं.

सेवा हीच भक्ती. सेवा हाच स्वामींचा प्रसाद.
श्री स्वामी समर्थ 🌸 जय शंकर 🌸

#tochieksamartha #ashramseva #swamiseva #swamisamarthmaharaj #seva
50
|| श्री स्वामी समर्थ जय शंकर ||

५०K चा टप्पा पूर्ण... मनःपूर्वक धन्यवाद !!

आपल्याला हे कळविताना अत्यानंद होत आहे की आज *सोमवार दिनाक १७ ऑगस्ट या श्रावणी सोमवारच्या पवित्र दिवशी स्वामींच्या आपल्या “तोचि एक समर्थ” परिवाराने इंस्टाग्रामवर ५०K मेंबर्सचा महत्त्वाचा आणि सुंदर टप्पा तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे, विश्वासामुळे आणि सततच्या पाठिंब्यामुळे पार केला आहे*. ही फक्त ५०K मेंबर्सची संख्या नाही, तर ५०,००० प्रेमळ मनांची साथ आहे, ५०,००० विश्वासांची शिदोरी आहे आणि आपल्या प्रत्येक प्रयत्नाला मिळालेली दाद आहे !

संस्थेच्या प्रत्येक पोस्टला लाईक करणाऱ्या, कॉमेंट करून आपलेपणाने प्रतिक्रिया देणाऱ्या, शेअर करून संस्थेचे उपक्रम अधिक लोकांपर्यंत पोहचवणाऱ्या आणि मनापासून फॉलो करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार*. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे, प्रोत्साहनामुळे आम्हाला पुढे जाण्
19
back to up